पर्यावरणाचा नाश होऊ द्यायचा नसेल तर सर्व उपाय केले पाहिजेत- जबाबदार निसर्गस्नेही उपभोग, उपभोगात घट, रिसायकल, टेक्नो फिक्सेस, ग्रीन शेती, लोकसंख्या नियंत्रण, ग्रीन रिन्यूएबल ऊर्जेचा वापर इत्यादी इत्यादी
पर्यावरण स्नेही लोक आपल्या गरजा कमी करून साधे राहत आहेत. ते रिसायकल करतात. एका लिटरमध्ये जास्त किलोमीटर चालणारी कार किंवा दुचाकी वापरतात. सायकल चालवतात. बस किंवा ट्रेन वापरतात पाश्चात्य देशात मुले नको म्हणत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे राजकीय अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि निसर्ग (पर्यावरण) हे अविभाज्य त्रिकुट आहे. ते समजले नाही, तर या वैयक्तिक कृती या कल्पनारम्यवादीच राहतात. त्यांनी लक्षणीय फरक पडणार नाहीये.......